
दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । फलटण । दक्षिण कोरियाची दिग्गज कार कंपनी Hyundai च्या 7 सीटर एसयूव्ही Alcazar ची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कंपनी लवकरच ही एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली आहे. त्याचे फलटण येथील कणसे ह्युंदाई येथे अनावरण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
काही दिवसांपूर्वीच Alcazar एसयूव्हीचा एक टिझर व्हिडिओदेखील कंपनीने जारी केला होता. कच्छच्या रण येथील त्या व्हिडीओत कंपनीच्या अन्य एसयूव्ही नवीन Alcazar एसयूव्हीचं स्वागत करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. यानुसार ही कार फलटण येथे लाँच केली गेली आहे. यावेळी कणसे ह्युंदाईचे फलटण शाखा प्रमुख सुशांत नलवडे, सुहास निंबाळकर, अक्षय निंबाळकर यांच्यासह फलटणमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, ही एसयूव्ही 7-सीटर आणि 6-सीटर अशा दोन प्रकारात येईल. इंजिनसाठी पेट्रोल आणि डिझेल असे दोन पर्याय मिळतील. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2.0 लिटर क्षमतेचे इंजिन असू शकते. हे इंजिन 159PS ऊर्जा आणि 192Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय, डिझेल व्हेरियंटमध्ये 1.5 लिटर क्षमतेचं इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन 115PS ऊर्जा आणि 250Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल.
टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. शिवाय, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटीसोबत व्हॉईस रिकग्नाइजेशन, 7.0 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनारोमिक सनरूफ, 6 एअरबॅग , व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, Isofix माउंटेड सीट, हिल स्टार्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) असे अनेक फिचर्स मिळतील.