पत्नीची दुचाकी पतीने चोरली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । सातारा । येथील मोळाचा ओढा परिसरातील शिंदे स्टील फर्निचरच्या पाठीमागे राहणाऱ्या पत्नीची दुचाकी तिचा पती प्रशांत सर्जेराव कीर्तीकुडाव (रा.कोडोली, सातारा) व त्याच्या एका अज्ञात साथीदाराने चोरून नेल्याची फिर्याद पत्नी निकिता प्रशांत कीर्तीकुडाव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निकिता या गेल्या काही दिवसांपासून मोळाचा ओढा परिसरातील शिंदे स्टील फर्निचरच्या पाठीमागे सनी भोसले यांचे घरात भाड्याने राहण्यास आहेत. दि. 15 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पती प्रशांत हा तिथे आला व त्याने त्यांची दुचाकी एक्टिवा (एम एच 11 सीई 3132) चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हवालदार दबडे- पाटील करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!