पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, सातारा, दि.०५: सातारा येथील बुधवार नाका परिसरात मारहाण आणि विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सागर सूर्यवंशी असे संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, सागर सूर्यवंशी हा संबंधित महिलेच्या घरात घुसला व त्याने तिच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीला सोडवण्यासाठी संबंधित महिला पुढे आली असता सागर सूर्यवंशी याने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुर्यवंशी याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!