दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फरांदवाडी (ता. फलटण) येथे सातारा ते फलटण रस्त्यावर पराग इंडस्ट्रीज कंपनीच्या समोर दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कारने (क्र. एमएच १४ बीएक्स ०८९१) पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील (क्र. एमएच ११ सीएक्स १०८१) पती-पत्नी जखमी झाले आहेत. या अपघाताची फिर्याद मोहन नाना रिठे (वय ५७, रा. ढवळ (पेडेवस्ती), ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून कारचालक अभय दिगंबर साळवे (रा. सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताचा अधिक तपास म.पो.हवा. राणी फाऴके करत आहेत.