सातारा जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रथमेश प्रदीप पवार यांचा प्रामाणिकपणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.१९: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फलटण शहरातील सकाळ-संध्याकाळ शाखेतील खातेदार दिलीप क्षीरसागर यांचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार बँकेतील शिपाई सेवक प्रथमेश प्रदीप पवार (रा.भैरोबा गल्ली, फलटण) यांना सापडला होता. तो त्यांनी शाखाप्रमुख राहुल अहिवळे यांच्याकडे तात्काळ जमा करुन प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवून दिला.

त्यानंतर दिलीप क्षीरसागर यांनी बँकेमध्ये शाखाप्रमुख यांच्याकडे दागिने विषयी चौकशी केली असता त्यावेळी त्याची खातरजमा करुन दागिना बँकेचे विभागीय विकास अधिकारी अविनाश खलाटे यांच्या हस्ते दिलीप क्षिरसागर यांना देण्यात आला. या प्रामाणिकपणाबद्दल दिलीप क्षीरसागर यांनी प्रथमेश पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात केला. 

प्रथमेश पवार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे चेअरमन श्रीमंत छत्रपती आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ यांनी प्रथमेश पवार यांचे कौतुक केले. याप्रसंगी विभागीय विकास अधिकारी बाबासाहेब बरकडे, विकास अधिकारी विश्‍वास गायकवाड, शाखा प्रमुख राहुल अहिवळे, कॅशियर सौ.प्रतिभा साळुंखे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!