कोळकीच्या हॉटेल लाईनचे होर्डिंग्ज थाटात उभे; प्रांताधिकार्यांचा आदेशाला सुद्धा केराची टोपली?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 29 मे 2024 | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या फलटण शिंगणापूर रोडवरील हॉटेल लाईनची सर्व होर्डिंग थाटात उभी असून यावर ग्रामपंचायत प्रशासन कारवाई न करता त्यांना अभय देण्याचे काम करीत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे घाटकोपर मध्ये होर्डिंग्ज पडून मोठी दुर्घटना झालेली होती. त्यानंतर फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण शहर व परिसरामधील सर्व होर्डिंग काढायचे आदेश दिले होते; परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा कोळकी ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी हद्दीमध्ये प्रामुख्याने फलटण शिंगणापूर रोडवर हॉटेल लाईन बघायला मिळते. वास्तविक पाहता शिंगणापूर रोड हा हॉटेल लाईन साठीच प्रसिद्ध झालेला आहे. लागोपाठ अनेक हॉटेल असल्याने फलटण शहरासह परिसरातील नागरिक या ठिकाणी जेवायच्या निमित्ताने येत असतात. अशा परिस्थितीमध्ये वादळी वाऱ्यामुळे जर याच हॉटेलचे असणारे होर्डिंग पडून काही दुर्घटना झाली किंवा ही दुर्घटना घडण्याची वाट कोळकी ग्रामपंचायत बघत आहे का ? असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित रहात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथील घाटकोपर मध्ये बोर्डिंग पडून मोठी दुर्घटना झालेली पाहायला मिळालेली होती. त्यावेळी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच अनुषंगाने फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण परिसरामध्ये असणारे सर्व होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी दिलेल्या आदेशाला सुद्धा कोळकी ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली असल्याचे मत परिसरात व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!