दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेतर्फे फलटण शहरातील होर्डींगबाबत सूचना जारी करण्यात आल्या असून उभारलेले होर्डींग २४ तासात काढावेत, असा आदेश नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी काढला आहे.
याबाबत मुख्याधिकार्यांनी दिलेल्या जाहीर नोटीसीद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, नगर परिषद हद्दीतील खाजगी इमारतींवर / सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या तमाम होर्डींगधारकांना तसेच रस्त्याच्या कडेला मोठया आकाराचे फ्लेक्स बोर्ड उभारणार्या जाहिरातधारकांना सांगितले आहे की, सद्य:स्थितीत वादळी वार्यामुळे मोठ्या आकाराचे होर्डींग बोर्ड तुटून रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्याअनुषंगाने होर्डींगधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे. उभारलेले होर्डींग २४ तासांचे आत काढून घेणेबाबत सूचना केली आहे.