फलटणच्या दादा महाराज मठात श्री भगवान परशूराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | फलटण |
फलटण अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र, फलटण यांच्यातर्फे दादा महाराज मठ, ब्राह्मण गल्ली येथे श्री भगवान परशूराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य नंदकुमार केसकर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जय परशूराम, जय श्रीराम यांच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला.

प्रारंभी नंदकुमार केसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या संस्थेतर्फे दर महिन्यात एक कार्यक्रम साजरा केला जातो, यावर्षी नुकताच पार पडलेला सार्वजनिक मुंजीच्या कार्यक्रम अत्यंत नियोजन पद्धतीने झाला, तसेच यावेळी कराड, कोरेगाव, कुर्डूवाडी व फलटण इथून नऊ मुंजी आल्या. यावेळीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व बटूंची दिमाखदारपणे मिरवणूक पार पडली, असे सांगून केसकर यांनी वर्षभर सादर होत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

यानंतर श्री भगवान परशूराम यांच्या संपूर्ण जीवनाबाबत व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती डॉ. श्रीपाद चिटणीस यांनी सविस्तर दिली. त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीबाबत त्यांना धन्यवाद देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याअनुषंगाने सादर करण्यात येणार्‍या कार्यक्रमाबद्दल स्वानंद चिटणीस, चंद्रशेखर दाणी, डॉ. माधुरी दाणी, अ‍ॅड. विजयराव कुलकर्णी यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी पुढील वर्षी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्याचे ठरले.

सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. आभार निखील केसकर यांनी मानले. या कार्यक्रमात संघटनांचे सर्व सभासद बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!