नीरा देवघर, भाटघर व वीरच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । फलटण । धोम – बलकवडी, नीरा – देवघर, वीर व गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला समाधानकारक नसली. पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने सर्व धरणे भरतील अशी अपेक्षा आहे.

23 टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 48 मि. मी. पाऊस झाला, आजपर्यंत 218 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 3.38 टीएमसी म्हणजे 14.39 टक्के पाणीसाठा आहे.

10 टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 20 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 134 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 6.90 टीएमसी म्हणजे 73.36 टक्के पाणीसाठा आहे.

12 टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरण परिसरात काल 0.68 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 367 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.97 टीएमसी म्हणजे 16.79 टक्के पाणी साठा आहे.

4 टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल 136 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 508 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.36 टीएमसी म्हणजे 36.85 टक्के पाणी साठा आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!