
दैनिक स्थैर्य । 21 जून 2025 । फलटण । धोम – बलकवडी, नीरा – देवघर, वीर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पावसाने दमदार सुरुवात केल्याने सर्व धरणे भरतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी दहा वाजता वीर धरणातून 2000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.
नीरा खोर्यातील धरणातील पाणी पातळी पुढील प्रमाणे – 23 टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 9 मि. मी. पाऊस झाला, आजपर्यंत 227 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 4.21 टीएमसी म्हणजे 17.92 टक्के पाणीसाठा आहे.
10 टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 0.00 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 134 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 7.70 टीएमसी म्हणजे 81.87 टक्के पाणीसाठा आहे.
12 टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरण परिसरात काल 27.00 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 394 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 2.52 टीएमसी म्हणजे 21.49 टक्के पाणी साठा आहे.
4 टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल 57 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 565 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.49 टीएमसी म्हणजे 40.37 टक्के पाणी साठा आहे.