
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर मठाचीवाडी येथे दि. १२ जानेवारी २०२४ रोजी उद्यान कन्यांद्वारे किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.
हा उपक्रम प्रमुख पाहुणे डॉ. एस. डि. येळे (समुदाय आरोग्य अधिकारी) तसेच अध्यक्ष गावच्या सरपंच सौ. जयश्री भोसले व इतर आरोग्य सहकारी यांच्या उपस्थितमध्ये पार पडला. या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या स्नेहल निकम, प्रज्ञा देशमुख, नम्रता ढोपरे, वैभवी रणवरे, गायत्री शेडगे, अस्मिता शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.