स्थैर्य, सातारा, दि. ४: लग्नासाठी घेतलेले उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून दोघाजणांनी एकास धक्काबुक्की करून व कपाळावर दगड मारून जखमी केले. याप्रकरणी भिकाजी हणमंत कदम वय 52 आणि आशा भिकाजी कदम वय 45 दोघे, रा. फडतरवाडी, ता. सातारा अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत सतीश दत्तात्रय कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयीत कदम यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सतीश कणसे यांच्याकडू हातउसने पैसे घेतले होते. यापैकी काही पैसे देणे बाकी राहिले होते. ही राहिलेली रक्कम कणसे यांनी मागितल्याच्या रागातून भिकाजी कदम आणि आशा कदम यांनी सतीश कणसे यांना गचुरे धरून खाली पाडून धक्काबुक्की केली. यानंतर आशा कदम यांनी कणसे यांच्या कपाळवर दगड मारला. यात ते जखमी झाले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो. ना. राऊत तपास करत आहेत.