धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : सातारा बसस्थानकाजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात दोघांनी धारदार शस्त्राचा दाखवून एकाकडून 1 लाख 20 हजारांची सोन्याची चेन जबरीने काढली. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना त्यांनी जखमी केले आहे.
याबाबत शुभम विश्‍वास यादव रा. शिवथर, ता. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभम यादव हे मित्र प्रणव साबळे याच्या समवेत सातारा येथील बसस्थानकावर दि. 3 रोजी रात्री 2 वाजता आले होते. यावेळी दोनजणांनी त्यांना गुप्तीचा धाक दाखवून जबरीने त्यांच्याकडील 1 लाख 20 हजारांची सोन्याची चेन काढून घेतली. यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र प्रणव साबळे यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने साबळे यांच्या चेहर्‍यावर गुप्ती मारली. यात साबळेंच्या चेहर्‍याला जखम झाली आहे तर शुभम यादव यांच्या दोन बोटांना गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एपीआय मोरे तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!