सरकारसोबतच्या चर्चेपूर्वीच हरियाणाच्या शेतकऱ्यांमध्ये विभाजन, 1.20 लाख शेतकऱ्यांनी केले सरकारचे समर्थन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.८: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 13
दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात
शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांची
सरकारसोबत बुधवारी म्हणजेच एकूण सहावी चर्चा होणार आहे. यापूर्वीच
हरियाणाचे शेतकरी दोन गटात विभागले आहेत. 1.20 शेतकऱ्यांनी सरकारला पत्र
लिहित शेतकरी कायद्याला समर्थन दर्शवले आहे.

शेतकऱ्यांनी
पाठवलेल्या या पत्रात लिहेल आहे की, नवीन शेतकरी विधेयक मागे घेऊ नये.
हरियाणाच्या फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशंस (FPOs) संबंधीत शेतकऱ्यांनी
असे म्हटले आहे. मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या सल्ल्यांनुसार कायद्यात बदल
करण्याची मागणी केली आहे.

केंद्र
सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या शेतकरी विधेयकांचा सर्वात जास्त विरोध
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी करत आहे. शेतकरी संघटनांनी कायदा मागे
घेण्याची मागणी लावून धरली आहे. हरियाणा-दिल्ली च्या 6 बॉर्डर आज बंद असणार
आहे. 13 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्लीला
चहूबाजूंनी घेरले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!