हरिष उर्फ आप्पा काकडे राष्ट्रवादीत


 

हरिष उर्फ आप्पा काकडे यांचे राष्ट्रवादी मध्ये स्वागत करताना श्रीमंत
रामराजे नाईक निंबाळकर शेजारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व आप्पा काकडे यांचे
सहकारी.

स्थैर्य, फलटण दि.२१ : राजकीय/सामाजिक क्षेत्रात सतत आघाडीवर राहुन काम करणारे हरिष उर्फ आप्पा काकडे यांनी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला असून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या येथील निवासस्थानी आयोजित प्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात देऊन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरिष काकडे यांचे व त्यांच्या सहकार्‍यांचे पक्षामध्ये स्वागत केले. 

हरिष काकडे सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर राहुन काम करीत असतात, त्यांनी विविध संघटना व पक्षामध्ये विविध पदे भूषविली आहेत. रिपाई आठवले गटामध्ये तालुकाध्यक्ष पदावरुन त्यांनी काम केले आहे. नॅशनल दलित मुव्हमेंट मध्ये त्यांनी काही काळ योगदान दिले आहे. 

हरिष काकडे यांनी त्यांना मिळालेला विविध पक्षातील पदे, साधने, सुविधांचा उपयोग गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रामुख्याने केला असून सतत समाजसेवेत व्यग्र असणार्‍या हरिष काकडे यांना राष्ट्रवादीचे व्यासपीठ, सामाजिक कामासाठी मोठी साधने, सुविधा उपलब्ध झाल्याने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर व्यक्त केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!