दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण शहरातील एका उपनगरात राहणार्या अल्पवयीन मुलीची वारंवार छेड काढणार्या संशयित रोहीत ज्ञानदेव कांबळे (रा. फलटण) याला विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित हा पीडित मुलीची वारंवार छेडछाड करत होता. तसेच त्याच्याशी प्रेमविवाह करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. त्याला पीडितेने विरोध केल्याने चिडलेल्या आरोपीने ती शिकत असलेल्या महाविद्यालयात जावून तिच्यासोबतसंशयित रोहित कांबळे हा पीडित अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे खोटे सांगून तिची बदनामी करत असल्याने दि.17 मार्च 2014 रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. फलटण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोडबोले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने पाच साक्षीदारांच्या साक्षी, पोलीस तपास व सरकारी वकील नितीन मुके यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरीची व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, साहाय्यक फौजदार उर्मिला घारगे, हवालदार शमशुद्दीन शेख,एस.एस.पाटील, गजानन फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, अमीत भरते यांनी काम पाहिले.