
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बाळासाहेब पाटील आहेत.
गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व विधीमंडळ व संसद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील नगर पालिकांचे नगराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी शेखर सिंह आहेत.
