
1985 मध्ये पाटण तालुक्यातील ’दिवशी’ या छोट्या गावातल्या ‘मुळे’ कुटुंबातील ‘प्रभा’ फलटणच्या ‘हेंद्रे’ कुटुंबात सून म्हणून आली. अल्पावधित कुटुंबात व समाजातही सगळ्यांची आवडती झाली. केवळ शिंपी समाजातच नव्हे तर इतर समाजातही हे जोडपे सर्वांचे लोकप्रिय ठरले आहे. स्वतःच्या अडचणींची पर्वा न करता हे जोडपे सर्व जाती जमातीसाठी झटत असते. समाजापयोगी अशा या कलंदर व दिलखुलास जोडप्याच्या लग्नाचा आज 40 वा वाढदिवस त्यानिमित्ताने…..
फलटणमधील सर्वात सुखी जोडपे कोणते? हा प्रश्न विचारला तर चटकन शेखर हेंद्रे व प्रभा हेंद्रे या जोडप्याकडेच अंगुली निर्देश केला जाईल, इतकं दिलखुलास वागणारं हे जोडपं आहे. आतापर्यंत अनेक जोडपी पाहण्यात आलेली आहेत. अनेकांच्या चेहर्यावर उदासपणा, नैराश्य दिसते. काही जोडपी साध्या साध्या संकटाने कोलमडून पडतात. परंतु हेंद्रे पती-पत्नी मात्र याला अपवाद आहेत. त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारची दुःखे व अडचणी आल्या. परंतु याला धीरोदात्तपणे तोंड दिले. आपल्याला आलेल्या अडचणींची तिळमात्र ओळख कुणालाही जाणवू दिली नाही. त्यांच्या समोरील अडचणींचा विचार केला तर दुसरे एखादे जोडपे मोडून पडले असते.
इतकी वर्षे घरातील व समाजातील सर्वांशी हसत खेळत जगणार्या या जोडप्याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या या जगण्याला आम्ही मनापासून दाद देतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या त्यांना सर्व परिचितांच्या व हितचिंतकांच्यावतीने मनःपुर्वक शुभेच्छा !!
– शिवाजीराव घोरपडे-गजेंद्रगडकर, फलटण