दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२४ | फलटण |
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उद्या, सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते सायं. ६ वाजेपर्यंत लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती साताराच्या सदस्या तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणच्या युवा नेत्या सौ. मनीषा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका व शहर भाजपा आध्यात्मिक आघाडी व महिला भाजपा आघाडीकडून करण्यात आले आहे.