विडणी येथे प्रभू श्रीराम भव्य मिरवणूक सोहळा


दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२४ | फलटण |
अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्त विडणी (ता. फलटण) येथे प्रभू श्रीराम भव्य मिरवणूक सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन उद्या, सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी केले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दीपकराव चव्हाण आहेत. तसेच श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे या मान्यवरांसह श्री. माधवराव अभंग, श्री. सर्जेराव नाळे, श्री. हणमंत अभंग, श्री. जगन्नाथ नाळे, डॉ. उत्तमराव शेंडे, श्री. सहदेव शेंडे, श्री. प्रवीण नाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, श्रीराम मिरवणूक सोहळ्यानंतर विडणी येथील उत्तरेश्वर मंदिरासमोर सायंकाळी ७.१५ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. सभेनंतर उत्तरेश्वर हायस्कूलसमोर स्नेहभोजन होणार आहे.

या सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी :

  • दुपारी १२.०० ते २.०० – धार्मिक विधी, श्रीकृष्ण मंदिर, विडणी
  • दुपारी २.०० ते सायं. ५.०० – भजन सेवा, श्रीकृष्ण मंदिर, विडणी
  • सायं. ५.०० ते ७.०० – प्रभू श्रीराम भव्य मिरवणूक सोहळा
  • सायं. ७.०० – प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन

या सोहळ्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन विडणी वि.का.स. सोसायटीचे चेअरमन श्री. मारूती नाळे, व्हा. चेअरमन श्री. साहेबराव ननावरे, संचालक मंडळ तसेच ग्रामपंचायत विडणीचे उपसरपंच श्री. सुनील अब्दागिरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!