विकसित कृषी संकल्प अभियानातून आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 13 जून 2025। फलटण । फडतरवाडी, फलटण येथे दिनांक 12 जून 2025 रोजी कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी विकसित संकल्प कृषी अभियान 2025-26 याविषयी माहिती दिली.

विकसित कृषी संकल्प अभियानातुन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वातावरणातील बदलानुरूप पिकांचे नवनवीन वाण, रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीपध्दती, पिकांच्या उत्पादनवाढीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान,पशुपालन, मत्स्यपालन, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांची माहिती सांगितली.

कृषिकन्या अश्विनी महानवर, वैष्णवी चांदगुडे, पायल नाळे, निधी कोडापे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम राबवला. कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यर्थ्याना मार्गदर्शन लाभले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!