दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सोनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत मधुमक्षिका पालन याविषयी शेतकर्यांना माहिती दिली. यावेळी मधुमक्षिका पालनाचे फायदे याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या हर्षल भालघरे, प्रीतल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषिकन्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.