पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । सातारा । पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार श्री गोरे यांचा काल फलटण येथे अपघात झाल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विषयी माहिती मिळताच पालकमंत्री श्री. देसाई यांनी तातडीने नागपूर येथून पुणे येथे येत आमदार श्री. गोरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी आमदार श्री गोरे यांची दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री महोदयांशी बोलणेही करून दिले.

पालकमंत्री श्री देसाई यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली व आमदार श्री गोरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. आमदार श्री गोरे यांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहनही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.

तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व सबंधित अधिकारी यांच्याशी ही चर्चा केली.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, धैर्यशील कदम, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मुनोत यांच्यासह आमदार श्री. गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!