पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपघातातील जखमींची विचारपूस

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । सातारा । महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी घाटात झालेल्या अपघातातील जखमींची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, सातारा तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जखमीपैकी तीन लहान मुलांना कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

महाबळेश्वर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर जाणाऱ्या मजुरांच्या गाडीचा अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्यामुळे हे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले. यातील सात जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका रुग्णाला उपचार करून घरी सोडण्यात आले. तर सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!