नाशिकमध्ये पाहणी करत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विविध ठिकाणच्या लॉकडाऊनचा आढावा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नाशिक, दि.१४: नाशिक शहरात सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरात विविध भागांची पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला.

नाशिक शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सायंकाळी ५.३० नंतर नाशिक शहरात विविध ठिकाणी पाहणी केली. या पाहणीला सिडकोतून सुरुवात करण्यात आली. सदर पाहणी मोरवाडी, उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल, सिव्हिल, सीबीएस, शालिमार, दूध बाजार, मेन रोड, अशोक स्तंभ, पंचवटी, पंचवटी भाजी मार्केट, पेठ रोड, रामवाडी, गंगापूर रोड, कॉलेज रोड मार्गे महात्मा नगर, एबीपी सर्कल, पिटीसी मार्गे पुन्हा मायको सर्कल, चांडक सर्कल, सारडा सर्कल, जुने नाशिक, बागवनपुरा, चौक मंडई, द्वारकामार्गे मुंबई नाका मार्गे नाशिक शहरात पाहणी केली. यावेळी शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!