शहिदांना अभिवादन करताना रणजित शिंदे, डॉ.पोपटराव मोहिते, प्रा.रविकुमार तिकटे व कर्मचारी |
स्थैर्य, बारामती दि.३ :मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना तिरंगा फौंडेशन, बारामती संचलित तिरंगा कॉलेज ऑफ अॅनिमेशनमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणार्या शहीद जवानांच्या मुलांच्या शैक्षणिक फी मध्ये 50% सवलत देणार असल्याचे जाहीर केले.
26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहीद हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तिरंगा फाऊंडेशन संचलित, तिरंगा कॉलेज ऑफ अॅनिमेशन आणि व्ही.एफ.एक्स., बारामती येथे या सर्व हुतात्म्यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष रणजीत शिंदे, डायरेक्टर- कार्पोरेट रिलेशन डॉ.पोपटराव मोहिते, प्राचार्य- रविकुमार तिकटे व तिरंगा कॉलेजचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
रणजित शिंदे यांनी पुढे म्हणाले, कॉलेज सध्या युवा कलाकारांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तिरंगा कॉलेज नेहमीच सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमात अग्रेसर असून विशेष म्हणजे कॉलेजमध्ये भारतीय संरक्षण खात्यात काम करणार्या जवानांच्या मुलांसाठी काही जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संस्थेत शिक्षण घेणार्या शहीद जवानांच्या मुलांसाठी इथून पुढे शैक्षणिक फी मध्ये 50%सवलत देण्यात येणार आहे. सध्या संस्थेत भारतीय जवानांची मुले व मुली शिक्षण घेत आहेत ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असून देशाच्या सेवेत राहण्याचा हा आपला छोटासा प्रयत्न आहे.