
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
