
दैनिक स्थैर्य | दि. 14 एप्रिल 2024 | तरडगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी अभिवादन केले आहे.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. तरडगाव येथील राहुल मित्र मंडळ, माऊली विचार मंच, माता रमाई महिला मंडळ व तरडगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत जयंतीनिमित्त असलेली ज्योत सुद्धा हातामध्ये घेऊन तरडगाव येथील फेरीत भाग घेतला.
आपण समाजामध्ये काम करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले पाहिजे. सामाजिक कार्य उभे करताना त्यामागे अनेक जणांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे आगामी काळात आपण नेहमीप्रमाणेच सर्वांना एकत्र घेऊन कार्यरत राहू; असे मत यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.