
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ना. वळवी, अवर सचिव वि. भास्कर आदिसह अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून त्यांना वंदन केले.
