दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या कार्याला वंदन व स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंत्रालयात या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून दर्पणकारांना वंदन केले.

 


Back to top button
Don`t copy text!