दैनिक स्थैर्य | दि. 12 जानेवारी 2024 | फलटण | स्वराज्याची संकल्पना मांडून ती सत्यात उतरवण्यासाठी राजमाता श्रीमंत छत्रपती जिजाऊ माँ साहेब यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राष्ट्रप्रेमाचे व राष्ट्रधर्माचे संस्कार केले होते. राज्य हे रयतेचे असावे; यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आजही प्रेरणादायी आहेत. अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजीराजेंना मार्गदर्शक म्हणून छत्रपती जिजाऊ माँ साहेबांनी केलेलं मार्गदर्शन रयतेच्या हिताचे होते; असे मत गोविंद भुजबळ यांनी फलटण येथील सावतामाळी मंदिर येथे छत्रपती जिजाऊ यांना जयंती निमित्त अभिवादन करताना व्यक्त केले.
या वेळी संत सावतामाळी मंदिरचे विश्वस्त विजय शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, कोळकीचे तंटामुक्ती अध्यक्ष पै. दत्तानाना नाळे, जाधववाडी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, फरांदवाडी ग्रामपंचायत सदस्य बंडू शिंदे, अमोल शिंदे, शनेश शिंदे, विकास शिंदे, वैभव नाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.