दैनिक स्थैर्य | दि. 12 जानेवारी 2024 | फलटण | राजमाता श्रीमंत छत्रपती जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे यांनी लिहिलेले “श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकी” हा ग्रंथ फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना भेट देण्यात आला आहे.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 350 वर्षे पूर्ण निमित्त तसेच राजमाता श्रीमंत छत्रपती जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती निमित्त फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना मोडी लिपी वाचक व इतिहास संशोधक पांडुरंग सुतार यांच्या हस्ते इतिहास आभ्यासक पोपटराव उर्फ राहुल पांडुरंग बर्गे लिखित “श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकी” हा ग्रंथ भेट देण्यात आला.