
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले.
वर्षा येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. रामायण महाकाव्याच्या आविष्कारातून महर्षी वाल्मिकींनी अत्युच्च प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. त्यातूनच प्रभू श्री रामचंद्रांचे प्रेरणादायी चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी महर्षी वाल्मिकींना विनम्र अभिवादन केले आणि जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.



