
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । १३ मार्च २०२३ । मुंबई । आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत तसेच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



