
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । मुंबई । केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अवर सचिव श्रीमती सायली कांबळे, रविंद्र जगदाळे, उमेश शिंदे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



