
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.११ एप्रिल २०२२ । मुंबई । महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने, उपसभापती, विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
