दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला तहसीलदार (सर्वसाधारण) सुषमा पैकेकरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार (पुनर्वसन) विवेक जाधव, नायब तहसीलदार महेश उभारे व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.