
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणूक झालेल्या १२ जागांपैकी भाजपाला ५ जागा मिळाल्या आहेत. धुळे व नगर महापालिकेत भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. या दोन्ही जागांवर पूर्वी अपक्ष उमेदवार निवडून आले होते. ढाणकी नगरपरिषदेत भाजपाने शिवसेनेकडे असलेल्या दोन जागा जिंकल्या आहेत. शिरोळ नगरपंचायतीत भाजपाने एक जागा जिंकली आहे. मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
