दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान, नाशिक यांच्यातर्फे प्रतिष्ठानचे प्रधान विश्वस्त व थोर शिक्षण तज्ज्ञ कै. सर डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी यांच्या छायाचित्रांचे अनावरण व स्मृती व्याख्यानमाला शनिवार, दि. २८ ऑटोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवपार्वती निवास, ब्राह्मण आळी, फलटण येथे आयोजित केली आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. स्मृती व्याख्यानमालेला ख्यातनाम वते डॉ. यशवंत पाटणे असणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिकच्या सचिव व खजिनदार प्राचार्य डॉ. सौ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुप्रिया पानसे, विश्वस्त व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस. एल. देशपांडे, प्रधान विश्वस्त शैलेश गोसावी, समन्वयक वि.वा. लक्ष्मीकांत जोशी, सचिव कल्पेश गोसावी, समन्वयक ब्रह्मानंद पराडकर यांनी केले आहे.