दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
काठीयावाडी मेहतर (रुखी) समाज विकास मंडळ महात्मा फुले नगर, कामगार वसाहत, फलटण यांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
२५ ऑटोबरपासून मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता फलटण तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणाला काठीयावाडी मेहतर (रुखी) समाजाच्या वतीने गुरुवारी पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी मेहतर समाज मंडळाचे अध्यक्ष अशोक मारूडा, उपाध्यक्ष देवीदास वाळा, कार्याध्यक्ष राजू मारूडा, सल्लागार लाला डांगे, सचिव मनोज मारूडा, नवरात्र उत्सव समितीचे सचिव आनंद डांगे, खजिनदार रमेश वाघेला, नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर मारूडा, उपाध्यक्ष निखिल वाळा, कार्याध्यक्ष अभय वाळा, समाजसेविका सौ. नंदा मारूडा, सदस्य सौ. आरती सोलंकी, सौ. गौरी डांगे, सौ. नीलम गलियल, सौ. रिना वाळा, सौ. दीपमाला वाघेला उपस्थित होत्या.