आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम वेळेत पूर्ण करा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | सातारा | माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे समाधान मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

माण तालुका हा दुष्काळी तालुका असून, येथील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधेचा अभाव असतो. जानेवारी महिन्यापासून या तालुक्यातील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आंधळी उपसा सिंचन योजना यामध्ये 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे लक्ष्य आहे. या योजनेच्या पूर्णत्वानंतर माण तालुक्यातील 14 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी केंद्रीय जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य नवीन कुमार, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अमोल निकम, विजय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने मोठी मदत केलेली आहे. ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी पाहणी दरम्यान सांगितले की, आंधळी उपसा सिंचन काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावे. जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य श्री. कुमार म्हणाले, आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

या योजनेमुळे माण तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल, ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. या योजनेच्या पूर्णत्वानंतर माणवासियांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!