औंध ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे व ग्रामस्थांनी केले ठिय्या आंदोलन


दैनिक स्थैर्य । दि. ३ जुलै २०२१ । औंध । औंध येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाचा अनागोंदी व मनमानी कारभार त्वरित थांबवा असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करून दिला.
ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी शनिवारी येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मनमानी कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले. यावेळी या आंदोलनात अजित माळी,ओंकार माने, सुमित दंडवते, हेमंत हिंगे, जमीर मुलाणी, रयत क्रांती दलाचे सदस्य ,ग्रामस्थ सहभागी झाले होते.

यावेळी केलेल्या ठिय्या आंदोलनावेळी वैद्यकीय अधिकारी , ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांना सागर जगदाळे व आंदोनकर्त्यांनी धारेवर धरत हा मनमानी कारभार त्वरित थांबवा , लसीकरण करताना रँपिग टेस्ट घेऊनच लसीकरण करा, नियमाप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना लस द्या, टोकन पध्दत पारदर्शक पणे राबवा, नागरिक, रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, सोशल डिस्टसिंग पाळण्यात यावे ,रुग्णांची व वयोवृद्ध नागरिकांची प्राधान्याने काळजी घ्यावी अशी मागणी लाऊन धरली .

त्याचबरोबर लसीकरण करणारा स्टाफच्या कारभाराची चौकशी करावी व वशिलेबाजी थांबवा अशी जोरदार मागणी यावेळी जगदाळे यांनी केली .

याबाबत योग्य ती कारवाई वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाने न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर व मनमानी कालभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!