लव्ह – जिहाद, धर्मांतरण तसेच गो हत्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा करावा


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२३ । फलटण । लव्ह जिहाद, धर्मांतरण तसेच गो हत्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक कायदा करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाने रविवारी फलटण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्या मध्ये हजारो कार्यकर्ते, महिला, युवक व युवती भगवे ध्वज हातात घेऊन भगव्या टोप्या भगवी वस्त्र परिधान करून “जय भवानी, जय शिवाजी” घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी फलटणमधील हिंदुत्ववादी संघटना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. फलटण तालुक्यातील सर्वच हिंदू संघटना यांनी एकत्र येऊन नेटके असे नियोजन केले होते. या मध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भगव्या ध्वजाचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा भगवा ध्वजासह छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महावीर स्तंभ – उमाजी नाईक चौक – गजानन चौक – महात्मा फुले चौक मार्गे मोर्चा फलटण प्रांताधिकारी कार्यालयात धडकला. यावेळी काही वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यानंतर प्रांताधिकारी शिवाजी जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी यासाठी स्वतंत्र कायदा करून या सामाजिक प्रश्नी शासनाने निर्णय घ्यावा. गोहत्या बंदी कायदा यासाठी केंद्र आणि राज्य असणारे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी समस्या नियुक्त केलेले आहेत. मात्र या कायद्याचे अंमलबजांनी आपल्या सातारा जिल्हात प्रशासना करीत नाही परिणामी राज्यातील मोठ्या प्रमाणात कमी होत चालले आहेत. 4 मार्च 2015 अन्वये मूळ कायद्यात दुरुस्ती करून नव्याने कायदा अस्तित्वात आणला आहे. मात्र या कायद्याचे पालन करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना देखील कार्यवाही व अंमलबजावणी होत नाही. ती त्वरित व्हावी. लोकसंख्या नियंत्रण कायदा व वक्फ बोर्ड रद्द करणे, देशात समान नागरी कायदा लागू करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!