फलटणमधील पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी शासन आदेश निर्गमित; खासदार रणजितसिंह यांनी दिलेला शब्द पाळला : जयकुमार शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | फलटण | फलटण शहरामध्ये असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरण, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा सुशोभीकरण, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुतळा सुशोभीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासह तेथील परिसर सुशोभीकरणासाठी शासन आदेश निर्गमित झाला आहे. फलटण शहरातील विविध पुतळे सुशोभीकरणासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच पाठपुराव्याने सदरील निधी मंजूर झाला असून खासदार रणजितसिंह यांनी शहरातील जनतेला दिलेला शब्द पाळला असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील जनतेला विकासात्मक राजकारण करण्याचा शब्द दिला होता. त्यामध्ये फलटण शहरात विविध पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार रणजितसिंह यांनी दिली होती. याबाबतचा शासन आदेश निर्गमित झाला असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जो शब्द देतात तो पूर्णच करतात; असेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

– खासदार रणजितसिंह यांनी मंजूर केलेला निधी –


Back to top button
Don`t copy text!