दैनिक स्थैर्य | दि. 09 जुलै 2024 | फलटण | संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सारथ्य करुन सुरवडी ते फलटण हा सुमारे ८ किलोमिटरचा टप्पा वारक-यांसमवेत चालल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की; पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्माचा पाया असून संतांनी शांती, समता व बंधूता या त्रिसुत्रीवर भक्कम केला आहे. वारकरी सांप्रदायाच्या आशीर्वादाने राज्यातील महायुतीचे सरकार उत्तम कार्य करीत आहे. हे सरकार वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे. त्याच्या मुळाशी अध्यात्म आहे. वारक-यांची सेवा हीच इश्वर सेवा मानून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी वारक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे सरकार भागवत धर्माच्या प्रचार प्रसारासाठी कटीबध्द आहे.
या वारीत खासदार श्रीरंग बारणे, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, बाळासाहेब काशीद, पुणे प्राधिकरणाचे सदस्य रमेश कोंडे, युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.