राज्यपालांची भेट : आता जाहीरच करतो, मी आरएसएस आणि भाजपसोबत आहे! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा


 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेकडून मारहाण करण्यात आलेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता जाहीरच करतो, मी आरएसएस आणि भाजपसोबत आहे असे ते म्हणाले आहेत.

मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मीडियाशी बोलताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, ‘आत्तापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे. मला जेव्हा मारहाण करण्यात आली तेव्हा शिवसेनेने माझ्यावर मी भाजप-आरएसएससोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.’ असे मदन शर्मा म्हणाले आहेत.

या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयीही निवृत्त नेव्ही ऑफिसर मदन शर्मा यांनी सांगितले आहे. राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसील. तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी माफी मागायला हवी असंही ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!