स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२३ । मुंबई । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली.

सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची व गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याची, देशाची एकता मजबूत राखण्याची तसेच नागरिक म्हणून आपले कर्तव्यपालन करण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी सर्व उपस्थितांना दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!