स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा शासन निर्णय जारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 10 हजार रुपये इतक्या निवृत्तीवेतनामध्ये 10 हजार रुपयांची वाढ करुन आता त्यांना दरमहा 20 हजार इतके निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे. ही वाढ 1 नोव्हेंबर, 2022 पासून लागू राहणार असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा निर्णय अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

Back to top button
Don`t copy text!