
दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । सातारा । भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ‘सद्भावना’ दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.