गुड थॉट्स : सुप्रभात……आज १७ फेब्रुवारी… तिरस्कार अन् पुरस्कार मिळतोच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


तिरस्कार आणि पुरस्कार काही मोठ केल्याशिवाय मिळत नाही. आता पर्यतचा इतिहास जगजाहिर आहे.काही कमविणे अन् काही गमविणे हे नियतीचे बाहुले आहे.देवादिकांना,साधू संताना,राजे महाराजे ,शास्त्रज्ञ ,साहित्यिक,राजकीय ,सामाजिक नव्हे नव्हे प्रत्येकच क्षेत्रात तिरस्कारा बरोबर पुरस्कार भेटतोच.

कोणत्याही क्षेत्रात आपण समाज हिताचे कार्य करीत असल्यास काही प्रमाणात कौतुक प्रेरणा पाठबळ मिळतेच.पण आपली जास्तच वाहवा होयाला लागली की खेचणारी प्रवृत्ती डोकेवर काढते.आरोप प्रत्यारोप,निंदा नालस्ती,टीका टिप्पणी ,खाजगी जीवनात डोकावणे,शाब्दीक चिखलफेक यतून कर्त्या प्रवृत्तीला खीळ बसते.जसे समुद्राला ओहोटी व भरती असते .तसे कर्त्याला कधी कधी शांत ,संयमी बसावे लागते.पण डोक्यावरच मिरे वाटायला लागल्यास कणखर ही व्हावे लागते.

चांगल्या प्रवृत्तीचा जनसमुदाय खरंच काम करणा-या व्यक्तीच्या पाठीशी असतो.प्रसंगी विघ्नसंतोषी प्रवृत्ती विरोध बंड करुन समाजहिताच्या कार्याला हातभर लावत असतो.आपलं नाव सतत चर्चेत राहिले की समजावे आपणाल तिरस्कार व पुरस्कार भेटणार.आपण लक्ष मात्र समाजहिताकडेच देणं.हाच खरा आपला पुरस्कार बाकी तिरस्कारांतून ही काही तरी शिकावे.त्या ही प्रवृत्ती आपले काम पुरस्कार मिळवण्यासाठीच करत असतात.बाकी आपण तिरस्कार की पुरस्कारच्या बाजूने हे ज्याच्या त्याच्या कामाने ठरवणे.

दुरितांचे तिमीर जावो,स्वधर्म सूर्य पहो

आपलाच पुरस्कारर्थी प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!